Friday, April 26, 2024
HomeजळगावBrikng News # भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने निलंबित

Brikng News # भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने निलंबित

भुसावळ Bhusawal। प्रतिनिधी

गौण खनिज प्रकरणात अधिकार नसतांना घेतलेले संशयास्पद निर्णय व भूमिकेबाबत भुसावळचे प्रांताधिकारी (Bhusawal District Magistrate) रामसिंग सुलाने यांचे आज महसुल मंत्री (Minister of Revenue) ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलंबित (suspended) करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर त्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी करण्याचे विधानसभेत सांगितले. या प्रकरणी भुसावळचे आ.संजय सावकारे व मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान येत्या 31 मे रोजी श्री.सुलाने हे सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.

- Advertisement -

आ.चंद्रकांत पाटील व आ.संजय सावकारे यांनी अवैध गौणखनिज प्रकरण तसेच अधिकार नसतांना फिरविलेले निर्णय हे व अन्य तक्रारींचा पाढा विधानसभेत वाचला होता. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील खडसे कुटुंबाची मालकी असलेल्या भुखंडावरील उत्खननाची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटी देखील निर्मित करण्यात आली आहे.

यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील महालक्ष्मी स्टोन क्रेशरच्या अवैध उत्खननाची देखील तक्रार केली होती. यात या स्टोन क्रेशर चालकाने 2017 ते 2019च्या दरम्यान अवैध उत्खनन केले. या प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र प्रांताधिकार्‍यांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात आली. यामुळे याप्रकरणी महसूल यंत्रणा ही स्टोन माफियांना पाठबळ देण्यात येत असल्याचा आरोप आ.पाटील यांनी केला.

आ.चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, आ.चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आ.संजय सावकारे यांनी देखील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या गैरकारभाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग यांचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा व त्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या