Thursday, April 25, 2024
Homeजळगाव# Breaking news : सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव यांच्या घरावर सशस्त्र...

# Breaking news : सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव यांच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न

जळगाव- jalgaon

शहरातील रिंगरोड परिसरातील (Ring road area) अजय कॉलनीतील (Ajay Colony) वाहन क्षेत्रातील उद्योजक (Entrepreneurs in the automotive sector) किरण बच्छाव यांच्या घरावर (home) सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सशस्त्रासह (armed) ६ ते ७ दरोडेखोरांनी हल्ला (robbers attacked) चढवला. किरण बच्छावसह पत्नी व मुलाला पिस्तूल आणि चाकू धाक (Pistols and knives in fear) दाखवून लूटण्याच्या (attempted robbery) प्रयत्न केला . परंतू आरडाओरड (screaming) झाल्याने नागरिकांची गर्दी (crowd of citizens) होऊ लागल्याने दरोडेखोरांनी (robbers) पोबारा केला.

- Advertisement -

Breaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटकजिल्हा दूध संघात आमदार खडसेंना मोठा धक्का

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. तर घराच्या काही अंतरावर पोलिसांना दरोडेखोरांची एक बॅग मिळून आली असून त्यात हातोडी, मिरची पूड आढळून आली आहे.

शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री ८.४५ वाजता जेवण आटोपून किरण बच्छाव हे घराच्या मागच्या खोलीत बसले होते. तर त्यांच्या पत्नी वैदांती बच्छाव या स्वयंपाकगृहात काम करीत होत्या. तसेच त्यांचा मुलगा हॉल मध्ये टीव्ही बघत होता.

नेहमी प्रमाणे बच्छाव यांच्या घरातील सुरक्षा रक्षक हे कुत्र्याला बाहेर फिरविण्यासाठी घेऊन गेले होते. रात्री ९ वाजता अचानक घराच्या  दरवाजाची बेल वाजली. वैदांती या दरवाजाजवळ आल्यावर त्यांना दोन तरुणांनी कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन बाबा रस्त्यावर चक्कर येऊन पडले आहे, असे सांगितले. वैदांती यांनी लागलीच दार उघडले.

अन् दुस-याच क्षणी हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्‍त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला. त्यातील दोघांनी सुरूवातीला वैदांती बच्छाव यांचा गळा पकडून स्वयंपाक घरापर्यंत ओढत नेले. त्यामुळे त्या आरडा-ओरड करू लागल्या.

Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी’

तिजोरी अन पैसे कुठे आहे

वैदंती या आरडा-ओरड करत असल्यामुळे ते  पाहण्यासाठी किरण बच्छाव हे आपल्या खोली बाहेर आले. तेव्हा त्यांना वैदंती यांना दोन दरोडेखोरांनी पकडले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तिजोरी कुठे आहे, पैसे कुठे आहे अशी विचारणा दरोडेखोर करत होते. यातच दरोडेखोर आणि किरण बच्छावांमध्ये झटापट झाली. यात दरोडेखोरांनी किरण बच्छाव यांना मारहाण करीत त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेले. 

दोरीने बांधून ठेवण्याचा प्रयत्न

दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी बॅगेतून दोरी काढली. त्यानंतर त्यांनी बच्छाव दाम्पत्याला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला. तसेच ऐका बेडरूमच्या दारवाजाला लाथा मारून ते दरोडेखोर घरातील आजी-आजोबांना आधी बाहेर काढा, असे म्हणू लागले. दरोडेखोरांनी बच्छाव दाम्पत्यास बांधण्यासाठी वापरलेली दोरी ही घरातच पोलिसांना मिळून आली. त्यासोबत एक ते दोन दरोडेखोरांचे रूमाल सुध्दा पोलिसांनी जप्त केले आहेत.

वाटलं तर सर्व देतो पण मुलाला काही करू नका

सुमारे पंधरा ते वीस मिनिट हा थरार सुरू होता. किरण बच्छाव यांच्या मुलाला दरोडेखोरांनी पकडण्याचा प्रयत्न केला. बच्छाव यांनी मुलाला काही झाले तर याद राखाल. तसेच तुम्हाला पाहिजे ते देतो पण मुलाला काही करू नका असे ते दरोडेखोरांना म्हणाले. घरातून जोरजोरात आरडा-ओरड होत असल्यामुळे बाहेर उभा एक दरोडेखोर इतरांना लवकर निघा, असे म्हणू लागला त्यानंतर गोंधळ जास्तच वाढल्यामुळे सर्व दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

पोलिसांचा फौजफाटा

उद्योजक बच्छाव यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पेालिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह स्थानिक गुन्हेशाखा, जिल्‍हापेठ आणि रामानंदनगर पोलिसांचा ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी धडकला.

सीसीटीव्ही फुटेज तपासणी  

पोलिसांकडून बच्छाव यांच्या घरातील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासनी केली जात होती. तसेच श्वान व ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्याशिवाय दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून तपासणी करण्यासाठी रवाना करण्यात आले.

मिर्चीपूडसह हातोडा आणला होता सोबत

दरोडेखोरांनी पळून गेलेल्या रस्त्याने सत्यवल्लभ हॉलजवळ एक बॅग पोलिसांना मिळून आली. त्यात हातोडी, मिरची पुड, माचिस, सिगरेट असे साहित्य मिळून आले. रात्री उशिरा पर्यंत पोलिस परिसरातील सिसीटीव्हीची पाहणी करत होते.

दरोडेखोरांचे हिंदी-मराठीत संभाषण

दरोडेखोर हे बच्छाव दाम्पत्याच्या घरी पायी आले होते. सर्वांनी तोंडाला रूमाल बांधले होते. त्यातील एक हिंदीत तर बाकीचे मराठीत बोलत होते. तर एकाने नुकतीच सिगरेट ओढली असावी म्हणून त्याच्या तोंडातून सिगरेटचा अधिक वास येत होतो, असे वैदांती बच्छाव यांनी पोलिसांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या