Breaking # आ. एकनाथराव खडसेचे भाजपात पुन्हा कमबॅक ?

एकनाथराव खडसेंची फोनवरून अमित शहांसोबत चर्चा : खा. रक्षा खडसें ; आ. चंद्रकांत पाटील यांनी सभेत केले होते वक्तव्य
Breaking #  आ. एकनाथराव खडसेचे भाजपात पुन्हा कमबॅक ?

जळगाव- jalgaon

राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी दिल्लीत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (BJP leader Union Home Minister Amit Shah) यांची भेट (visit) घेतल्याचा गौप्यस्फोट (Secret explosion) आ. चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी मुक्ताईनगर येथे झालेल्या मुख्यत्र्यांच्या सभेत केला होता. त्याला आ. खडसे यांच्यासह खा. रक्षा खडसे (MLA Khadse with MP Raksha Khadse) यांनी देखील दुजोरा (Confirmed) दिला असून त्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट झाली नाही, मात्र एकनाथराव खडसे यांची फोनवरुन (phone) अमित शहा यांच्यासोबत चर्चा (discussion) झाली आहे अशी माहिती विद्यापिठात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिली. त्यामुळे खडसेचे पुन्हा भाजपात कमबॅक होणार (Khadse's comeback in BJP ?) का याबाबत राजकीय गोटात (political group) चर्चेला उधाण (discussion arose

) आले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन दिवसांपूर्वी मुक्ताई नगरात विविध विकासकामांचे उदघाटन केले. यावेळी जाहीर सभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जावून अमित शहांची भेट घेतली असल्याचं वक्तव्य केल होत.

तसेच गुरुवारी पुन्हा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकार परिषदेत खडसे यांनी अमित शहांची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला होता. दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसे हे भाजपात जाणार की काय अशाही चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

यावर रक्षा खडसें यांना विचारले असता, काही जण याविषयाचं राजकारण करत असून खडसे राष्ट्रवादीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते भाजपात जाणार का याबाबत त्यांना कल्पना नसल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भेट नाही पण फोनवरून चर्चा मात्र झाली एकनाथ खडसे यांची अमित शहांची भेट झाली का याबाबत खासदार रक्षा खडसे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की,  अमित शहांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे व मी दिल्लीत गेले होते, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे अमित शहांची भेट झाली नाही. मात्र यानंतर एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली, काय चर्चा झाली आहे असे विचारले असता, रक्षा खडसे यांनी उत्तर देणे टाळले. तसेच खडसे भाजपमध्ये येणार आहे का असे विचारले असता, मला तर माहित नाही, मात्र आता तरी मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी असल्याचे सांगत त्यांनी अधिकचे बोलणे टाळले.

खासदार रक्षा खडसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com