Breaking # विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात मविआचा अविश्वास प्रस्ताव

Breaking # विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात मविआचा अविश्वास प्रस्ताव

नागपूर : Nagpur

मविआच्या (Mavia) नेत्यांनी विधानसभा सचिवांना (Assembly Secretary)पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) अविश्वास प्रस्ताव (motion of no confidence) दाखल केला आहे.

नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या हल्ल्यात आता महाविकास आघाडीने मोठं पाऊल उचललं आहे. मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव राजेंद्र भागवत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकासआघाडीने घेतलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे

हे आहे कारण

विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप झालाय.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com