Breaking # जळगाव महापालिकेत भाजपला धक्का : गटनेते भगत बालाणीचे नगरसेवक पद धोक्यात

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgon । प्रतिनिधी

महापालिकेतील (Municipal Corporation) भाजपचे गटनेते भगत बालाणी (BJP group leader Bhagat Balani) यांचे जात प्रमाणपत्र (Caste certificate) जळगाव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने (Jalgaon Caste Certificate Verification Committee) अवैध (invalidated) ठरविले आहे. त्यामूळे बालाणी यांचे नगरसेवक पद (Councilor post at stake) धोक्यात आल्याने हा भाजपाला मोठा (Big blow to BJP) धक्का आहे.

दूध संघातून 1800 नव्हे तर 3350 किलो तुपाची विक्री

जळगाव महानगर पालिकेच्या 2018 च्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 16 मधून भगतकुमार बालाणी मागासवर्गातून वर्गातून निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले होेेेते. परंतू ते खुल्या प्रवर्गातील असतांना त्यांनी इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढविण्याची तक्रार चेतन नारायण शिरसाळे यांनी केली होती.

पातोंडा परिसर विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार

त्यांनी जातीच्या दाखल्यावर खोडाखाड करुन नाशिक जात पडताळणी कार्यालयातून खोटे दस्ताऐवज देवून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप चेतन शिरसाळे यांनी केला होता. त्यानुसार चौकशी करुन समितीने बालाणी यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याची माहिती शिरसाळे यांनी दिली आहे.

अतिक्रमण काढताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यूबर्फवृष्टीत अडकलेल्या चिंचखेडा येथील जवानाला वीरमरण

समितीने असे दिले आदेश..

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार भगतकुमार बालाणी यांचा जगीयासी या इतर मागासवर्ग प्रवर्गाचा जातीदावा अमान्य केला आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक यांनी भगतकुमार बालाणी यांना निर्गंमित केलेले जगीयासी जातीचे इतर मागासवर्ग प्रवर्गांतील वैधता प्रमाणपत्र फेरचौकशी आधारे नमुद निष्कर्ष व त्यांचे विवेचन आधारे रद्द केले आहे.

वैधता प्रमाणपत्र तत्काळ नाशिक समितीकडे जमा करावे, उपविभागीय अधिकारी यांनी भगत कुमार बालाणी यांना निर्गमित केलेले मुळ जातीचे प्रमाणपत्र जप्त करुन सरकाजमा करण्याची कारवाई करावी, तसेच बालाणी यांनी राखीव जागेवर मिळविलेला लाभ तात्काळ काढून संबधित निवडणूक अधिकारी यांनी आवश्यक व कायदेशिर कार्यवाही करावी, उभय पक्षांना या आदेशाविरुध्दा दाद मागवायची असल्यास मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपिठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करता येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मला कोणतेच कागदपत्र किंवा निकाल मला मिळाले नाही, जे कागदपत्र मागितले ते आपण सादर केले होते. माझ्याकडे प्रत्यक्ष निकाल येईल त्यावेळी योग्य तो खुलासा करेल.

भगत बालाणी, नगरसेवक, मनपा जळगाव

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *