Saturday, April 27, 2024
HomeधुळेBreaking # आर्वी शिवारात गोव्यातील दीड कोटींचा विदेशी मद्य साठा जप्त

Breaking # आर्वी शिवारात गोव्यातील दीड कोटींचा विदेशी मद्य साठा जप्त

धुळे Dhule/ प्रतिनिधी :

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Nashik State Excise Department) नाशिकच्या भरारी पथकाने (Bharari Squad) तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) आर्वी शिवारात सापळा (trap in Arvi Shivara) रचत कंटेनरमधून वाहतूक (transported) होणारा परराज्यातील विदेशी मद्यसाठा (foreign liquor) पकडले. कंटेनरसह सुमारे दीड कोटीचा विदेशी मद्यसाठी (1.5 crores for foreign liquor) जप्त करण्यात आला. तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पथकाने काल रात्री आर्वी शिवारात महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल शांतीसागर जवळ वाहन तपासणी सुरू केली. सापळा रचुन गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा अवैधरीत्या वाहतुक करणार्‍या एमएच 12 एलटी 4255 क्रमांकाच्या कंटेनर पकडले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचा साठा मिळून आला. 1 कोटी 23 लाख 37 हजार 920 रूपये किंमतीचा मद्यसाठा व 22 लाखांचा ट्रक असा एकुण 1 कोटी 45 लाख 38 हजार 420 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहन चालक एके रामनकुट्टी (वय 42, रा. आसरखंडी, केदावर, पो.तामरचेरी, जि.कोझीकोड केरळ) व क्लीनर शिवानंद शंकर कट्टीकार (वय 32 रा. बेन चिनमर्डी जि.बेलगम कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे. तर मद्य पुरवठादार, मद्य विकत घेणारा संबधीत ज्ञात-अज्ञात फरार इसम तसेच जप्त वाहनाचा मालकाची पथकाचे चौकशी सुरू केली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्याचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ तसेच धुळे विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले यांनी केली.

या कारवाईसाठी निरीक्षक आर. आर. धनवटे व अधिकारी, कर्मचारी, भरारी पथकाचे निरीक्षक डी.एल.दिंडकर तसेच मालेगाव विभागाचे निरीक्षक एस. वाय. श्रीवास्तव व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी मदत केली. गुन्ह्याचा पुढील तपास ए. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण हे करीत आहेत.

तरी नागरिकांनी अवैध मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक याबाबत कोणतीही तक्रार असल्यास अथवा याबाबत माहिती असल्यास या विभागाच्या टोल फ्री (क्र.18008333333) व व्हॉट्स अ‍ॅप (क्र.8422001133) तसेच दुरध्वनीवर (क्र. 0253/2319744) संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या