Sunday, April 28, 2024
HomeजळगावBreaking# मित्रावर हल्ल्याची भिती, न्यायालयात चॉपरची सोबती

Breaking# मित्रावर हल्ल्याची भिती, न्यायालयात चॉपरची सोबती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

खुनातील (murder) संशयित मित्रावर (suspicious friend) हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी चॉपर (Chopper)घेवून आलेल्या दर्शन उर्फ चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय-32, रा. कांचननगर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch team) पथकाने न्यायालयातून (court) मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 20 इंचीचे धारदार चॉपर हस्तगत करण्यात आले आहे. सोमवारी न्यायालयात खुनाचा बदला घेणार्‍यांचा कट उधळून लावला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी न्यायालयात चॉपर घेवून आलेल्या तरुणाला अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

जुन्या वादातून माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे याच्यावर लाडू गँगने हल्ला करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती. याप्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे, गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय सपकाळे, रुपेश संजय सपकाळे व महेश राजू निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही संशयित जामिनावर बाहेर असल्यानंतर आकाश सपकाळे याच्यावर विक्की अलोने याच्यासह त्याच्या साथीदारांनी घरात घुसून गोळीबार केला होता. परंतु या हल्ल्यात आकाश हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान, हा हल्ला खूनाचा सूड उगविण्यासाठी झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये धूसफूस सुरु आहे.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअपMakeup Part 4 # असा करा Self makeup

साक्षीदारची नोंदविली साक्ष

राकेश सपकाळे खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरु असून मंगळवारी सकाळी 11 वाजता या गुन्ह्यातील साक्षीदार सोनू अशोक सपकाळे याची साक्ष नोंदविण्यात येणार होती. न्यायालयाची तारीख असल्याने या गुन्ह्यातील संशयित आकाश सपकाळे यांच्यासह न्यायालयीन कोठडीत असलेले संशयितांना न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयात कामकाज सुरु असतांना आकाशला संरक्षण देण्यासाठी त्याचा मित्र दर्शन उर्फ चंद्रकांत शर्मा हा चॉपर घेवून न्यायालयात हजर होता.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअपमित्रच झाला मित्राचा वैरी, चॉपरने सपासप वार करी

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सोमवारी संशयितांवर होणारा हल्ल्याचा कट उधळून लावल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी न्यायालयात संवदेशनशील प्रकरणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी एलसीबीचे 10, शहर पोलीस ठाण्याचे 10 अणि आरसीपीचे एक प्लाटून असा बंदोबस्त तैनात केला होता.

गुलाबरावांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!पोलिसाची पत्नीला क्रूर वागणूक, सासरच्यांविरोधात तक्रार झाली दाखल

मारण्यासाठी नव्हे, संरक्षण द्यायला आलो

न्यायालयात साक्ष नोंदविण्यात येणार असल्याने दोन्ही गटातील तरुणांनी न्यायालयाच्या आवारात दाखल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांना हुलकावून लावले होते. मात्र पोलिसांचे संरक्षण कडे व त्यांची नजर चुकवून दर्शन हा न्यायालयात शिरला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरुन एलसबीचे संजय हिवरकर, संतोष मायकल, विजय पाटील, प्रितम पाटील व राजेश मेंढे यांनी संशयित दर्शनला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आपण मारण्यासाठी नव्हे तर मित्राला संरक्षण देण्यासाठी आलो असल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

फरार अरुण गवळी अखेर गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या