Wednesday, April 24, 2024
HomeजळगावBreaking # भाजपा-शिंदे गटाच्या साथीने पवारांनीच उलथविली राष्ट्रवादीची सत्ता

Breaking # भाजपा-शिंदे गटाच्या साथीने पवारांनीच उलथविली राष्ट्रवादीची सत्ता

* दोन्ही मंत्र्यांच्या खेळीने सत्ता परिवर्तन

* जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात

- Advertisement -

* भाजप, शिंदे गटामुळे संजय पवारांची पॉवर

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जिल्हा दूध संघानंतर आता जिल्हा बँकेतही राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन (BJP Minister Girish Mahajan,), शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Shinde group minister Gulabrao Patil) आणि चार फुटीर संचालकांच्या सहकार्याने राष्ट्रवादीचे प्युअर बहुमत असलेली सत्ता उलथवून लावली. राष्ट्रवादीचे नवनियुक्त विधान परिषद गटनेते आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांना धक्का देण्यासाठीच ही खेळी खेळली गेली. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचा पराभव करून चेअरमनपदी विराजमान झाले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Jalgaon District Central Cooperative Bank) चेअरमनपदाची (Election of Chairman) निवडणूक आज चर्चेचा विषय ठरली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

आ. खडसेंच्या निवासस्थानी बैठक

जिल्हा बँकेत सुरूवातीचे तीन वर्ष राष्ट्रवादीची सत्ता राहील असे सूत्र ठरले होते. त्यानुसार आज जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी नाव निश्चीत करण्याकरीता राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई निवासस्थानी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अ‍ॅड. रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, प्रदीप देशमुख, नाना राजमल पाटील, संजय पवार, घनशाम अग्रवाल, अ‍ॅड. रोहिणी खडसे, ठाकरेे गटाच्या संचालिका महापौर जयश्री महाजन हे उपस्थित होते.

दरम्यान बैठकीत चेअरमनपदासाठी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे नाव चर्चेत आले. यावेळी प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, संजय पवार यांनीही इच्छा दर्शविली. यात सर्वानुमते तसेच पक्षाचे श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

चार संचालक फुटले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. शिंदे गटाचे पाच, भाजपाचे एक, ठाकरे गटाचे एक आणि फुटीर तीन संचालक यांच्या बळावर संजय पवार चेअरमनपदी विजयी झाली.

या निवडणुकीत ठाकरे गटाचे एक आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील तीन असे एकूण चार संचालक फुटल्याने राष्ट्रवादीच्या हातातून जिल्हा बँक निसटली. आता हे चार फुटलेले संचालक कोण? याविषयी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे.

पालकमंत्र्यांसह आ. चव्हाणांकडून पवारांचा सत्कार

जिल्हा बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संजय पवार यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विठ्ठल-रूख्मीणीची मुर्ती देऊन सत्कार केला. तसेच पालकमंत्र्यांनी स्वत: चेअरमन संजय पवार व व्हाईस चेअरमन अमोल चिमणराव पाटील यांना त्यांच्या खुर्चीत बसविले. तसेच यावेळी स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला नवनिर्वाचित चेअरमन संजय पवार व व्हा. चेअरमन अमोल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची प्रचंड आतषबाजी केली.

सहकारात पक्ष नाही, मी बंडखोरी केली नाही

सहकार क्षेत्रात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जात नाही. त्यामुळे मी कुठलीही बंडखोरी केली नाही.20 वर्षाचा इतिहास बघा, कसे कसे पॅनल झाले होते. नाथाभाऊ जेव्हा भाजपमध्ये होते तेव्हाही आम्ही त्यांच्या पॅनलमध्ये रहायचो. सहकारात राजकारण नसतेच. अनेक वर्षांपासून आमचे आणि जिल्हा बँकेचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्यामुळे या बँकेचे नेतृत्व करावे अशी इच्छा होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. माझ्यासाठी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, ठाकरे गटाचे संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादीचे संचालक, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह काही संचालकांनी छुप्या पध्दतीने सहकार्य केले. जिल्हा बँकेत शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला आमचे प्राधान्य राहिल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित चेअरमन संजय पवार यांनी दिली.

पालकमंत्र्यांसह आ. चव्हाणांकडून पवारांचा सत्कार

जिल्हा बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संजय पवार यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विठ्ठल-रूख्मीणीची मुर्ती देऊन सत्कार केला. तसेच पालकमंत्र्यांनी स्वत: चेअरमन संजय पवार व व्हाईस चेअरमन अमोल चिमणराव पाटील यांना त्यांच्या खुर्चीत बसविले. तसेच यावेळी स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला नवनिर्वाचित चेअरमन संजय पवार व व्हा. चेअरमन अमोल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची प्रचंड आतषबाजी केली.

शिवसेना, काँगे्रेसकडून विश्वासघात- आ. खडसे

जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एक मत फुटले. ज्यांच्यासाठी मी परिश्रम घेतले त्यांनीच आमच्यासोबत गद्दारी केली. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस व शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन द्यायला पाहिजे होते. परंतु त्यांनी संजय पवारांना समर्थन देवून विश्वासघात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेची निवडणुक लढवायला कोणीही तयार नव्हत.

गेल्या निवडणुकीत सर्व पक्षीय पॅनल म्हणून निवडणुक लढविली. परंतु यंदाच्या निवडणुकीत संजय पवार यांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. हा विषय महाविकास आघाडी म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातला आहे. पवारांनी विरोधकांशी हातमिळवणी करीत पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे

. परंतु काँग्रेस आमच्यासोबत असल्याचा आम्हाला विश्वास असल्याने आम्ही पवारांकडे दुर्लक्ष केल होेते. तसेच भाजपचे आ. संजय सावकारे यांना निवडणुकीत शेवटच्या क्षणी मी निवडून आणले असल्याने त्यांनी देखील आमच्यासोबत राहणे अपेक्षीत होते. मात्र ते दोघे आमच्यासोबत रााहिले नाही. संजय पवारांनी केलेल्या या गद्दारीची माहिती पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांना दिली जाईल अशी प्रतिक्रिया आ. खडसे यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या