Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'ब्रेक द चेन' कर्फ्यूचा पहिला दिवस: पाहा नाशिकमधील परिस्थिती

‘ब्रेक द चेन’ कर्फ्यूचा पहिला दिवस: पाहा नाशिकमधील परिस्थिती

सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे

बुधवारी रात्री ८ वाजेपासून महाराष्ट्रात मिशन ‘ब्रेक द चेन’ सुरू झाली आहे. नाशिकसह राज्यात संचारबंदी आहे. कलम १४४ अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्ये पहिल्या दिवशी सकाळपासून रस्त्यांवर वाहने बऱ्याच प्रमाणात आली. अनेक ठिकाणी पोलिसांचे तंबू लावले असले तरी अजून बंदोबस्त नाही. मुख्य बाजारपेठेत बॅरिकेड्स लावलेले नाही.

रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्यांची चौकशी होत नाही. जर नाशिकमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर ‘ब्रेक द चेन’ होणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्फ्यू दरम्यान आयुष्यासाठी आवश्यक आणि खूप आवश्यक असलेल्या सेवा सुविधा बंद केल्या जाणार नाहीत, परंतु या कामांसाठी नियमांचे उल्लंघन आणि गर्दी होऊ नये. जर नियमांचे पालन केले जात नसेल तर या सुविधा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिले होते.

नाशिकमध्ये रस्त्यांवर झालेली गर्दी कमी झाली नाही तर शहरात इतर सुरु असलेल्या सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. पुण्यात प्रशासनाने किराणा दुकानेही बंद केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्यांना विचारणा झाली पाहिजे, हे काम फक्त पोलिस प्रशासनाने करावे, असे नाही तर नागरिकांनी स्वय: शिस्त पाळली पाहिजे. काम नसताना घराबाहेर पडणे टाळले पाहिजे तरच आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू.

- Advertisment -

ताज्या बातम्या