चीनला ईशारा : अशांतता निर्माण करणाऱ्यास योग्य उत्तर देऊ

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीचे देशाला संबोधन
रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद

नवी दिल्ली New Delhi

आम्हाला शांती हवी, मात्र कोणाला अशांती हवी असेल त्याला योग्य उत्तर देऊ, असा सनसनीत टोला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चीनला नाव न घेता दिला. राम मंदिर निर्मितीवर देशातील जनतेला अभिमानाची अनुभूती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramanath Kovinde) हे देशाला संबोधित करत आहेत. त्यांनी देशातील नागरिकांना देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सीमा वादावर बोलतांना राष्ट्रपती म्हणाले, आज जगासमोर करोनाचे मोठे आव्हान आहे. मात्र, आमच्या शेजाऱ्याकडून विस्तारवादाचे धोरण अंगीकारले जात आहे. आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करतांना आपले बहादूर जवान शहीद झाले. भारताचे हे सुपुत्रांनी देशाच्या गौरवासाठी आपले प्राण दिले. आज पुर्ण देश त्यांना नमन करत आहे. त्यांच्या पराक्रमातून आम्ही दाखवून दिले आहे की, आमची आस्था शांततेत आहे. परंतु कोणी अशांतात करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जोरदार उत्तर दिले जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com