प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव, जाणून घ्या काय आहे योजना?

प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव, जाणून घ्या काय आहे योजना?

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” (book village) साकारण्यात येणार आहे. पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव (book village)सुरु करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक १९ कोटी ७९ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

भिलारच्या (bhilar)धर्तीवर ‘पुस्तकांचे गाव’ ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी दिल्या होत्या.

पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरु करतांना पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र असलेले, वाड:मयीन चळवळ, साहित्यिक वैशिष्ट्य असलेले गाव, केंद्र, राज्य संरक्षित स्मारक, कृषी पर्यटनाचे केंद्र असलेले, पुस्तकाचा खप अधिक असलेले गाव निवडले जाईल. यामध्ये संत गाडगेबाबा पारितोषिक प्राप्त गावे, आदर्श गाव, तंटामुक्त, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता यासारख्या शासनाच्या अभियानात योजनेत पात्र ठरलेली पुरस्कार प्राप्त केलेली गावेही निवडता येतील. असे करतांना गावातील लोकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती ही लक्षात घेतली जाईल. यासाठी मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

हे आहे पहिले पुस्तकाचे गाव

सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे जगातील दुसरे, (पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे) आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव आहे

काय आहे योजना

कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे.. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा.. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२००० ते १५००० पुस्तके.. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com