Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक ऑक्सिजन लिकेज : उच्च न्यायालयाकडून सुमोटो दाखल

नाशिक ऑक्सिजन लिकेज : उच्च न्यायालयाकडून सुमोटो दाखल

मुंबई

नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला असून एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

बुधवारी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. सुमोटो याचिका म्हणजे न्यायालयाने या प्रकरणात स्वतः लक्ष्य दिले आहे.

नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

- Advertisment -

ताज्या बातम्या