Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रSameer Wankhede : समीर वानखेडेंना दिलासा! अटकेपासून संरक्षण कायम, मात्र...

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिलासा! अटकेपासून संरक्षण कायम, मात्र…

मुंबई | Mumbai

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केलेली आहे.

- Advertisement -

तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना ८ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. परंतु कोणतीही माहिती माध्यमांना न देण्याची तंबी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

Sameer Wankhede : …तर माझाही आतिक अहमद होऊ शकतो;समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

यासगळ्या सगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडे यांच्यासमोर ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट हे व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या