Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिल्लीत इस्रायल दूतावासबाहेर बाँबस्फोट

दिल्लीत इस्रायल दूतावासबाहेर बाँबस्फोट

नवी दिल्ली

दिल्लीत इस्रायल दूतावासबाहेर IED बाँबस्फोट झाला. या स्फोटात पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले. या स्फोटात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisement -

बाँबस्फोट झाल्यानंतर घटनास्थळी दिल्ली पोलिसांची विशेष टीम पोहचली असून त्यांनी तपास सुरु केला आहे. प्रजाकसत्ताक दिनाची परडे झालेल्या ठिकाणापासून केवळ १.७ किमी अंतरावर हा स्फोट झाला.

या स्फोटात अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती आलेली नाही. इस्त्रायल दूतावास तुगलक रोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. दूतावासाजवळ काही वर्षांपूर्वी एका चालत्या इनोव्हा कारच्या खाली एक अज्ञात बाईक स्वार बॉम्ब फेकून फरार झाला होता. पोलिसांनी सांगितलं की, हा स्फोट इस्त्रायल दूतावासात झालेला नाही. त्याच्या जवळील बंगला क्रमांक 6 मध्ये ब्लास्ट झाला आहे. सध्या घटनास्थळी गुप्तचर विभाग, स्पेशल सेल आणि क्राईम ब्रांन्चचे अधिकारी तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या