Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याअभिनेता अक्षय कुमारचे हेलिकाॅप्टर लॅण्डिंग चौकशीच्या भोवऱ्यात

अभिनेता अक्षय कुमारचे हेलिकाॅप्टर लॅण्डिंग चौकशीच्या भोवऱ्यात

नाशिक । प्रतिनिधी

अभिनेता अक्षय कुमारच‍ा नाशिक दौरा आता वादाचा भोवर्‍यात सापडला असून त्यांच्या हेलिकाॅप्टर लॅण्डिंगला कोणी परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत.

- Advertisement -

भुजबळ यांनी शनिवारी (दि.४) ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी पत्रकारांनी अक्षय कुमारच्या हेलिकाॅप्टर लॅण्डिंगबाबत विचारले असता भुजबळांनी जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले.

करोना संकटात मुख्यमंत्री ठाकरेंपासून सर्व मंत्री हेलिकाॅप्टर ऐवजी वाहनाने प्रवास करत आहे. हवाई प्रवास व परवानग्या शक्यतो टाळल्या जात आहे. ते बघता अभिनेता अक्षय कुमारला नाशिकमध्ये हेलिकाॅप्टर लॅण्डिंगची परवानगी कोणी दिली? तसेच रिसॉर्ट मध्ये राहण्याची परवानगी कशी मिळाली याबाबत वाद निर्माण झाला आहे.

गुरुवारी अक्षय कुमार नाशिकमध्ये आला होता. सपकाळ नाॅलेज हबच्या हेलिपॅडवर अक्षय कुमारचे खासगी हेलिकाॅप्टर लॅण्ड झाले होते.

या लॅण्डिगला जिल्हा प्रशासनाची परवानगी कोणी दिली हा मुद्दा वादाच्या भवर्‍यात अडकला आहे. शिवाय सपकाळ नाॅलेज हब हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दित येत असताना शहर पोलिसांनी सुरक्षा दिली कशी? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

या सर्व प्रकरणाचे पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच या प्रकरणाबाबत पूर्ण माहिती नसल्याने बोलणे उचित ठरणार नाही, असे भुजबळ यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या