बोगस क्रीडाप्रमाणपत्र प्रकरण : अटकेतील खेळाडूचे 'नाशिक कनेक्शन'

बोगस क्रीडाप्रमाणपत्र प्रकरण : अटकेतील खेळाडूचे 'नाशिक कनेक्शन'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस क्रीडा प्रमाणपत्रद्वारे (Bogus Sport Certificate) शासकीय नोकरी (Government Job) मिळण्याचे प्रकार उघडकीस आले होते. नगर येथील कोषागार कार्यालयात क्रीडा प्रमाणपत्राद्वारे नोकरी प्राप्त केलेला संशयित प्रभाकर धोंडीबा गाडेकरला पुण्यातील हिजंवडी (Hinjewadi Police) पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे....

दरम्यान २०१८ मध्ये झालेल्या २९ व्या सिनिअर स्टेट सेपक टकरा चॅम्पियनशीपमध्ये (2018 senior state Sepak takraw championship) संबधित नाशिक संघाकडून (Nashik team) खेळण्याचे दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे त्याला बोगस प्रमाणपत्र मिळवून देणारे सेपक टकरा संघटनचे पदाधिकारी देखील पोलिसांच्या रडारवर आहे.

सेपाक टकरा (Sepak takraw) या खेळातील बोगस प्रमाणपत्राच्या अधारे प्रभाकर गाडेकर यांनी २०१९ मध्ये नगर येथील शासकीय नोकरी मिळवली होती. या प्रकारामुळे मात्र प्रत्यक्ष खेळलेल्या खेळांडूवर होत असल्याने या प्रकाराबाबत नाशिकच्या काही खेळांडूनी राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत पुण्यातील हिजंवडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सेपक टकरा संघटनेचे पदाधिकारी कृणाल अहिरे याला काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. दरम्यान आता या प्रकरणात बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी प्राप्त करणाऱ्या प्रभाकर गाडेकर कारवाई अटक केली होती. चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रावारी दि. २४ त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.

दरम्यान, बोगस क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या या प्रकरणात शहरातील काही क्रीडा प्रशिक्षकांचे देखील नाव समोर येत असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.