नाशिकच्या हायप्रोफाईल भागात भोंदूबाबाचा भांडाफोड

मुलंबाळ होत नसलेल्या महिलेकडे मागितले ५० हजार, अश्लील चाळेही केले
नाशिकच्या हायप्रोफाईल भागात भोंदूबाबाचा  भांडाफोड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशकात भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाचा (Fake Godman) पर्दाफाश झाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून (Annis) (अंनिस) हा भांडाफोड करण्यात आला असून भोंदुगिरी करणाऱ्या या बाबाला अटक करण्यात आली आहे...

अधिक माहिती अशी की, गंगापूर रोडवरील (Gangapur Road) एका इमारतीत स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत होता. अनेक नागरिकांना त्याने गंडवले असल्याची माहिती अंनिसकडे होती.

यानंतर पोलिसांच्या मदतीने अंनिसने एक बनावट ग्राहक या भोंदूबाबाकडे पाठवले होते. या महिलेने भोंदूबाबाकडे जाऊन मुलबाळ होत नसल्याचे सांगितले. या बाबाने महिलेला मुलबाळ होईल असे आश्वासन देत ५० हजार रुपयांची फी मागतिली. तसेच महिलेशी अश्लील वर्तन करण्याचाही प्रयत्न केला.

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला असून त्याच्याविरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. (Complaint registered at Gangapur Police Station)

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार (API Nitin Pawar) हे तपास करत आहेत. अंनिसकडून राज्यसरचिटणीस डॉ टी आर गोराने, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा प्रधान सचिव ऍड समीर शिंदे, आआपाचे जितेंद्र भावे यांनी हा भांडाफोड केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com