राहत्या घरात महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मुंबई | Mumbai
मुंबईतील कामगार नगरमधील शरद सोसायटीत नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये (Nehrunagar Police Station) कार्यरत असलेल्या एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह (Dead Body) राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल एडके (वय ३५) असे महिला उपनिरीक्षकाचे (Lady Sub-Inspector) नाव असून त्या मागील दीड वर्षांपासून सिक लिव्ह म्हणजेच आजारपणाच्या सुट्टीवर होत्या.
एडके या मुंबईतील कामगार नगरमधील शरद सोसायटीमध्ये ५ व्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यांच्या राहत्या घरातून मृतदेहाचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना (Police) कळवले. यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ADR गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचं (Suicide) वाटत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.