Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापोहण्यासाठी गेलेल्या 'त्या' दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले

पोहण्यासाठी गेलेल्या ‘त्या’ दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

चेहडी येथील दारणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी दोघेजण नदीच्या प्रवाहात अडकल्याने हे दोघे युवक नदी पात्रात बुडाले होते. तब्बल 24 तासानंतर या दोन्ही युवकांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत…

- Advertisement -

सिन्नर फाटा परिसरात राहणारे सिद्धांत गांगुर्डे, दीपक महानुभव, संतोष मुकणे, आर्यन जगताप असे चौघे युवक पोहण्यासाठी दारणा नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धार्थ गांगुर्डे व दीपक महानुभव हे दोघे युवक पाण्याचा प्रवाहात बुडाले होते.

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीत १३ टक्के मतदान

त्यानंतर या दोघांचाही अग्निशमन दलाच्या वतीने शोधकार्य सुरू होते. अखेर या दोघांचाही आज सायंकाळी नदीच्या पात्रातच मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : सिन्नर-शिर्डी महामार्गावर आगीचे तांडव

- Advertisment -

ताज्या बातम्या