Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशभीषण दुर्घटना! समुद्रात बोट बुडाल्याने १५ जणांना जलसमाधी

भीषण दुर्घटना! समुद्रात बोट बुडाल्याने १५ जणांना जलसमाधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

इंडोनेशियामध्ये प्रवासी बोट (Indonesia Boat Capsized) बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. इंडोनेशियाच्या सुलावेसी ( Island of Sulawesi) बेटावर ही बोट बुडाल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण बेपत्ता आहे. दरम्यान अद्याप मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

इंडोनेशियाच्या रेस्क्यू एजन्सीने सांगितले की, फेरीतील १९ जण अद्याप बेपत्ता आहेत. सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या फेरी बुडण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. शोध आणि बचाव संस्थेचे अधिकारी मोहम्मद अराफाह यांनी सांगितले की, सर्व मृतांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्याच वेळी, बचावलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

Bar Set on Fire : बारमधून बाहेर काढल्यामुळे मद्यपीने लावली आग; ११ जणांचा होरपळून मृत्यू

मृतांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पहिले पथक पाण्याच्या आत जाऊन शोध घेईल. तर दुसरे पथक पाण्याच्या वर थांबून दुर्घटनेच्या ठिकाणी मृतदेहांचा शोध घेईल. दरम्यान, रिपोर्टनुसार दक्षिण-पुर्व सुलावेसी प्रांताची राजधानी केंदारीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या मुना बेटाची खाडी हे प्रवासी बोटीने पार करत होते. महत्त्वाचे म्हणजे, इंडोनेशियामध्ये फेरी हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहे.

Gyanvapi Case : ज्ञानव्यापीचे ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

इंडोनेशिया १७,००० पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह असलेल्या इंडोनेशियामध्ये बोट हे वाहतुकीचे प्रमुख आणि सामान्य साधन आहे. येथे अशा दुर्घटना होणे सामान्य आहेत. बोटींच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या सुरक्षा निकषांमधील त्रुटी आणि कमकुवत लाईफ सपोर्ट सिस्टीम याची मुख्य कारणं आहेत. यंत्रणेकडे दुर्लक्ष करून क्षमतेपेक्षा जास्त माल बोटीवर चढवणं हेही उघडपणे या अपघातांना निमंत्रण देते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या