अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले

अमरावती

श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत (wardha river incident) नाव उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत.

अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सापडलेले मृतदेह

1. नारायण मटरे, वय 45 वर्ष, रा. गाडेगाव

2. वांशिका शिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसाघाट

3. किरण खंडारे, वय 28 वर्ष, रा. लोणी

नावेतील इतर प्रवासी

1. अश्विनी खंडारे, रा. तारासावगा

2. वृषाली वाघमारे, रा. तारासावंगा

3. अतुल वाघमारे, रा. तारा सावंगा

4. निशा मटरे, रा. गाडेगाव

5. अदिती खंडारे, रा. तारा सावंगा

6. मोहिनी खंडारे, रा. तारा सावंगा

7. पियुष मटरे, रा. गाडेगाव

8. पूनम शिवणकर, रा. तिवसाघाट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com