उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; लटकेंचा राजीनामा आयुक्त फेटाळणार?

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; लटकेंचा राजीनामा आयुक्त फेटाळणार?

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे (shivsena) धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) गोठवल्यानंतर शिवसेना प्रथमच 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावासह मशाल चिन्हावर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीच्या (Andheri East by-election) रिंगणात उतरणार आहे...

या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. लटके या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी असल्याने त्यांनी एक महिन्यापूर्वी राजीनाम्याचा अर्ज दिलेला असून बीएमसी प्रशासनाने तो स्वीकारला नाही.

आज लटके या मुंबई महानगरपालिकेत आपला राजीनामा मंजूर करावा, यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांकडून त्यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com