Monday, April 29, 2024
Homeजळगावजळगावात रक्ताचा तुटवडा

जळगावात रक्ताचा तुटवडा

लालचंद अहिरे

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

- Advertisement -

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जळगावचे तापमान दिवसागणिक (temperature rising) वाढत आहे. तसेच तप्त उन्हाचे चटके बसत असून जीवाची लाही-लाही होत असल्याने रक्तदान शिबिर (Blood donation camp) घेणार्‍यांनी देखील शिबीरांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील काही रक्त पेढ्यांमध्ये (blood bank) देखील एबी निगेटीव्ह आणि बी पॉझिटीव्ह ग्रुपच्या रक्त साठ्याचा (blood reserves) तुटवडा (Shortage) जाणवू लागला आहे.

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

लोकसंख्येबरोबरच शहरातील रस्त्यांचा देखील विस्तार करण्यात आलेला आहे. तसेच स्पर्धात्मक युगात धावपळ देखील वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रवास करताना घाई होऊ लागलेली आहे. या घाई गरबडीत अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. एखाद्या अपघाताच्या वेळी रक्ताची नितांत गरज भासू लागते. सध्या शहरात तीन ते चार रक्तपेढ्या कार्यरत आहेत. मात्र, उन्हळ्याच्या दिवसात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्तसाठा देखील घटत आहे. परिणामी शहरातील रक्तपेढ्यांमध्येही रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे.

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

मात्र, सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच काहींना सुट्टया लागलेल्या आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरु झालेली आहे. काही लग्न सराईत व्यस्त आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणार्‍या बर्‍याच मोठ्या कंपन्या यांच्याकडून कर्मचारी कपात झालेली असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.एखादा आपघात आणि आपतकालीन परिस्थितीत जिल्ह्यातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आपले योगदान देत आहेत.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

या तीव्र उन्हाळ्यात आवश्यक रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी व सात ते आठ दिवस पुरेल असा काही रक्त गटाचा साठा शिल्लक आहे. तर एबी निगेटीव्ह व बी पॉझिटीव्ह ग्रुप रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था यांनी छोट्या- छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन रेडक्रॉस रक्त केंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासानी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन गोवळकर रक्तपेढीचे विजय कुलकर्णी यांनी केले आहे.

ए ग्रुप, एबी ग्रुप रक्ताचा तुटवडा

सध्या रेडक्रॉस रक्तपेढी, माधवराव गोवळकर रक्तपेढी, गोदावरी ब्लड बँक यासह शहरात रक्तपेढ्या कार्यरत आहेत. रेडक्रॅास सोसायटीमध्ये एकूण 354 रक्ताचा साठा शिल्लक आहे. मात्र, ए ग्रुप, एबी ग्रुप रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तर माधवराव गोवळकर रक्त पेढीत एबी निगेटीव्ह ग्रुप रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तर ए ग्रुप,एबी ग्रप, ओ ग्रुप आदी रक्त साठ्याचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. तर काही ग्रुपचे केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती रक्तपेढीच्या सूत्रांनी दिली.

तप्त उन्हामुळे रक्तदान शिबिरांनी फिरविली पाठ

सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या तर काहींच्या सुरु आहे. त्यामुळे महाविद्यालय बंद आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामात नागरिक व्यस्त आहेत. त्यात लग्नसराई सुरु आहे. या तीव्र उन्हामुळे रक्तदान करणार्‍यांची संख्या कमी आहे. रक्तदान शिबिरे बंद आहेत. मात्र, एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास रेडक्रॉस सोसायटीतर्फे हवा असलेल्या रक्तगटाचा डोनर शोधून त्या रक्त गटाची पूर्तता करुन देतो.

डॉ.प्रसन्नकुमार रेदासानी, चेअरमन, रेडक्रॉस रक्त केंद्र ,जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या