Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यागोदावरीच्या सौंदर्याला बाधा

गोदावरीच्या सौंदर्याला बाधा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

तपोवनातील (tapovan) कपिला (Kapila) – गोदावरी नदी (godavari river) संगम पात्रात पाणवेलींचे प्रमाण वाढल्याने एकूणच गोदावरीच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. याबाबत पर्यटकांसह (Tourists) नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गोदावरी-कपिला संगम हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र पाणवेली कमालीच्या वाढल्याने नदीपात्र (river bed) दृष्टीस पडत नाही. एसटीपी केंद्रातून मलजलयुक्त सांडपाण्यावर (sewage containing sewage) व्यवस्थित प्रक्रिया होत नसल्याने शहरातून वाहणार्‍या नदीपात्रात पाणवेली वाढत असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

तपोवनात (tapovan) देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. परराज्यातील श्रद्धाळू भाविक गंगेचे पाणी प्राशन करून घरातील धार्मिक विधींसाठी हे पाणी बाटलीत भरून गावी घेऊन जातात. आता नदीपात्रात पाणवेली वाढल्याने भाविक काय बोध घेत असतील, असा सवाल सूज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. नदीपात्रात पाणवेली वाढल्याने डासांचा (mosquitoes) प्रादुर्भाव होतो.

नदी पात्रातील पाण्याला दुर्गंधी येते. पहाटे फिरण्यासाठी, व्यायाम, ध्यानधारणा करण्यासाठी शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक येथे नियमित येत असतात. संबंधित विभागाच्या अकार्यक्षमतेचा फटका बसून नदीपात्राचे प्रदुषण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

सकाळ-सायंकाळ फिरावयास जाताना या ठिकाणी उग्र वास येतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

– अनिल घोडके, स्थानिक नागरिक

- Advertisment -

ताज्या बातम्या