Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशनमाज पठण सुरु असतानाच मशिदीत स्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी

नमाज पठण सुरु असतानाच मशिदीत स्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी

पेशावर | Peshawar

पाकिस्तानमधील पेशावरच्या एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १५० जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

बॉम्बस्फोटामुळं मशिदीचा एक भाग जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे.जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. पण या बॉम्बस्फोटात मोठं नुकसान झाल्याचं वृ्त्त आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाल्यानंतर मशिदीचं छत कोसळलं आहे. नमाज सुरु असताना हल्लेखोरानं बॉम्बनं स्वत:ला उडवलं. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी मार्च 2022 मध्ये शिया मशिदीत मोठा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात किमान 200 लोक जखमीही झाले आहेत. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार येथील जामिया मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध शिया मशिदीत हा स्फोट झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या