Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याउत्तरप्रदेशात भाजपाचा करिष्मा, पंजाबात आआपाची सत्ता

उत्तरप्रदेशात भाजपाचा करिष्मा, पंजाबात आआपाची सत्ता

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चारही राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने करिष्मा केला आहे (BJP won elections in four states ) . उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (Chief Minister Yogi Adityanath )यांचा जादू पुन्हा चालली आहे. योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि बसपाचा सुपडा साफ झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने तोकडी लढत दिली, पण भाजपला सत्तास्थापनेपासून राखू शकले नाहीत.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 272 जागांवर दावा ठोकला आहे. 403 विधानसभा जागा असणार्‍या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 202 जागांची गरज असते. भाजपने ही मॅजिक फिगर पार केली आहे. योगी आदित्यनाथ दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 126 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर बसपा फक्त एका जागेवर जिंकली आहे. तर जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सत्ताकायम राखली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. याच मतदार संघातून लढणार्‍या भीम आर्मीचे चंद्रशेखर यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना केवळ 5 हजार 409 मत मिळाली आहेत. देशातील सर्वात लहान राज्य गोव्यात भाजप तिसर्‍यांदा सरकार स्थापन करणार आहे. येथे 40 पैकी 20 जागा जिंकल्या. त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) 3 अपक्ष आणि 2 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारे त्यांचा आकडा 25 झाला आहे, जो बहुमतापेक्षा 4 अधिक आहे.

काँग्रेसला केवळ 11 जागा जिंकता आल्या.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. आम आदमी पक्षालापहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश मिळाला आहे. त्यातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत, पण पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री चेहरा बनवलेले अमित पालेकर निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

काँग्रेसचा ‘झाडू’न पराभव

अमृतसर । पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे.आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपचा क्लिन स्वीप केला आहे. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गेली वर्ष, दीड वर्ष पंजाब शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत होते. आता निवडणुकीत पंजाबच्या मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. रात्री 8 वाजेपर्यंत आलेल्या कलानुसार ‘आप’ने 92 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस फक्त 18 आघाडीवर आहे. अकाली दल आणि भाजप यांना दुहेरी संख्या गाठता आली नाही. कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिद्दूसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांचा तर त्यांच्या दोन्ही मतदार संघात पराभव झाला आहे.माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंग कोहली यांंनी पराभव केला.

आज उत्साहाचा, उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. मी या निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या या निर्णयासाठी मतदारांचे आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या माता-भगिनींनी, आमच्या तरूणांनी ज्या प्रकारे भाजपाला भरपूर समर्थन दिले आहे. तो खूप मोठा संदेश आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान Narendra Modi, Prime Minister

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मतदारांनी केजरीवाल दहशतवादी नाही, तर मतदारांची मनं जिंकणारे आहेत. आतापर्यंत सत्ता भोगलेल्यांनी सामान्यांना गरीब ठेवले आहे. त्यांनी फक्त सामान्यांना लुटण्याचे काम केले. त्यामुळे पंजाबमध्ये सत्तेत येऊ नये हे त्यांचे स्वप्न होते. मात्र, मतदारांनी त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आता ही क्रांती संपुर्ण देशात पसरेल.

अरविंद केजरीवाल, आआप Arvind Kejriwal, AAP

पंजाबमधील जनतेने निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा पराभव केला आणि आम आदमी पक्षाला कौल दिला. पंजाबच्या शेतकर्‍यांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी आहे. महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी भाजपला आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागेल.

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar, President NCP

आम्ही जनादेशाचा स्वीकार करतो.आम्ही पराभवातून शिकू आणि या पुढे चांगल्यासाठी काम करू.

राहुल गांधी, नेते, काँग्रेस Rahul Gandhi, Leader, Congress

- Advertisment -

ताज्या बातम्या