आगामी लोकसभेसाठी भाजपचे मिशन 141

सीतारामन यांच्याकडे बारामतीची जबाबदारी
आगामी लोकसभेसाठी भाजपचे मिशन 141

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने मिशन 2024 ( Mission 2024 by BJP )हाती घेतले असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या 141 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांवर 141 जागांची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे मंत्री त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि रणनीती आखतील. 2019 मध्ये भाजपचा 14 मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपने चार समूह तयार केले आहेत. या 14 मतदारसंघांत सध्या समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसचे खासदार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्याकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला( Baramati ) खिंडार पाडण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे.

सीतारामन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. 1996 पासून बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचे वर्चस्व आहे. 1996 ते 2009 पर्यंत याच मतदारसंघातून शरद पवार लोकसभेवर गेले. 2009 पासून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुळेंसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, त्यांचा जवळपास 70 हजार मतांनी पराभव झाला. 2019 मध्ये भाजपने सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली. मात्र, सुळेंनी त्यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com