भाजपचा 2024 साठी ‘महाविजय अभियान’ चा नारा, ‘अशी’ असेल रणनीती  

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | Nashik

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज नाशिकमध्ये (Nashik) पार पडली, या बैठकीत भाजपची (BJP) काय रणनीती ठरते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. त्याप्रमाणे महत्वाची घोषणा आजच्या या बैठकीत झाली आहे. भाजपने प्रदेश कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत ‘मिशन-२००’ चा नारा दिला असून, आगामी निवडणुकांसाठी (Elections) ‘महाविजय 2024’ (Mission 2024) म्हणून ‘संकल्प’ केला आहे. 

सामान्य लोकांच्या मनातील चीड दिसून आल्याने सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही

देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रराज्य हे अत्यंत महत्वाचे आहे. नियमित वेळापत्रकानुसार निवडणुका झाल्यास पुढील विधानसभा (Legislative Assembly and Lok Sabha) आणि लोकसभा  निवडणुकांना केवळ दीड वर्षे बाकी आहे, त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत आहे. याचाच भाग म्हणून भाजपने २०२४ च्या निवडणुकांसाठी आपला संकल्प निश्चित केला आहे.

भाजपचा 2024 साठी ‘महाविजय अभियान’ (Mahavijay Abhiyan) चा नारा, दिला असून त्यासाठी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकार्‍यांना संपर्कासाठीच्या काही तंत्र सांगण्यात आले. या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय निश्चित करण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.

काँग्रेसला धक्का! ‘या’ तालुक्यात पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यात त्यांनी 65लाख पत्र जिल्हाभरात वाटप करण्याचे सांगतानाच एक कोटी 60 लाख लोकांपर्यंत आपले कार्य पोहोचवण्याचा निर्धार दिला. बेस्ट ऑफ बिजेपी या संकल्पनेत 10 लाख नागरीकांची नोंद करण्यासोबतच 25 लाख युवा वॉरियर्स उपक्रमाचे संयोजन गतिमान करण्याचे आवाहन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

याबरोबरच प्रत्येक बूथवर 40 नवे मतदार नोंदणी करण्याचा संकल्प दिला. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात आपण बिजेपीची बांधणी केल्यास आगामी 15  वर्ष आपणाला सत्तेतून कोणीच हटवू शकणार नसल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले, राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम मागील अडिच वर्षात थांबले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी आमच्या सरकारला अडिच वर्षाची टी ट्वेंटी मॅच खेळावी लागणार आहे. आपण तेही करुन दाखवणार असून, आता आपण महाविजय अभियान सुरु केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वशक्तीने कामाला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

राज्यातील विविध विकास कामांची माहीती सांगताना त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता खोर्‍यामध्ये वाहू जाणारे पाणी गोदावरीच्या (Godavari) खोर्‍यामध्ये आणायचे आणि या ठिकाणी आमचा मराठवाडा दुष्काळ (drought) मुक्त करायचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांची रणनीती संदर्भात सोशल मीडियाचा (Social media) एक विषय या ठिकाणी झाला तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, 2024 च्या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया याकरता महत्त्वाचा असणार आहे असेही सांगण्यात आले. कोट्यावधी आपले मतदार हे 18ते 30 या वयोगटातील असल्याने हा जो सगळा मतदार युवा वॉरियर्सच्या माध्यमातून जोडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *