शिवसेनेचा वाद भाजपच्या पथ्यावर?

शिवसेनेचा वाद भाजपच्या पथ्यावर?

शिवबंधनाची नाळ तळागाळात जोडण्याची गरज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिवसेनेची बंडाळी (Rebellion in Shiv Sena )ही राजकीय वर्तुळात गंभीर पडसाद उमटू देणारी असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध प्रति शिवसेना ( Shivsena) अशीच लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे किंवा प्रति शिवसेनेचे भले होईल किंवा नाही मात्र यातून भाजपचे चांगभले होणार आहे.

शिवसेनेच्या इतिहासात अनेक वेळा बंडळीचे प्रसंग आले. खिंडार ही पडले. मात्र पहिल्यांदाच शिवसेना प्रमुखांच्या क्षमतेला आव्हान देणारी बंडाळी झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार्‍या शिवसेना प्रमुखांची या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मानहानी झाली आहे. पक्षाघातानंतर झालेल्या घडामोडींचा परिणाम सामान्य कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूप धारण करत असतो. त्यात प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांद्वारे वर्षा बंगला सोडताना शिवसैनिकांच्या भावनांमध्ये प्रकर्षाने जाणवला.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्यात सहभागी होणारे सामान्य शिवसैनिक यांच्या विचारांवर असलेला शिवसेनेचा पगडा तसाच कायम राहणार आहे की बदलत्या वाऱ्या सोबतच त्यात बदल होईल हे पहावे लागेल. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांच्या भावना कुठे व कोणा सोबत आहेत हे जाणून घेण्याची खरी गरज आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलं शिवसेनेचे उमेदवार हे शिवसेनेच्याच लोकाच्या अंतर्गत कुरघोड्यांंमुळे पडल्याचे अनुभवले आहे. मोठ्या मोठ्या निवडणुका शिवसेना हरली असेल तर ती अंतर्गत हेवेदाव्यांमुळेच.

आगामी काळात भाजपा सोबत बंडखोरांनी सत्ता स्थापन केली तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीत शिवसेना विरुद्ध प्रति शिवसेना अशी लढत रंगल्यास नवल वाटू नये. सेनेतील असंतुष्टांना या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आगामी निवडणूकांच्या लढतीमध्ये निवडणुकांच्या रिंगणात मतांची विभागणी ही शिवसेना विरुद्ध प्रति शिवसेनेतच होणार आहे. आणि आपोआपचया लढतीत त्रयस्त असलेल्या भाजपचं मैदान मारणार आहे. त्यामुळे भाजपने केलेली ही खेळीएकाच दगडात दोन पक्षी मारण्यासह दूरगामी परिणाम देणारी ठरणार आहे.

स्थानिक पातळीवर शिवसेनेची पदाधिकार्‍यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे आजच्या घडीला ठाकरे समर्थकच जास्त दिसून येत असले तरी नजीकच्या काळात सरकार स्थापन झाल्यानंतर हे चित्र उघडपणे समोर येईल त्यावेळी शिंदे समर्थक खऱ्या अर्थाने पुढे येतील.आमदारांच्या संख्येप्रमाणेच त्याचा ओढा कोणत्या गटाकडे जातो. हे चित्रही लवकरच समोर येईल. यातून सावरण्यासाठी शिवसेनेला तळागाळातून पूर्नबांधणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. केवळ बाळासाहेब ठाकरे याचंया नावाने नव्हे तर पक्षाच्या माध्यमातून त्यांच्याशी नाळ जोडण्याची मोठी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com