
दिल्ली | Delhi
देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात हालचाल पाहायला मिळत आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार होत असून मतदान यंत्रांमध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप वारंवार होत आहे. विरोधी पक्षानेही हा मुद्दा उपस्थित करत भाजपाला टार्गेट केलं आहे.
दरम्यान, भाजपाच्याच एका खासदारांनी केलेल्या विधानामुळे मतदान यंत्रांवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठलंही बटण दाबा, मत भाजपालाच मिळणार, असं विधान भाजपाच्या खासदारानं केलं आहे. तेलंगणातील भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. भाजप खासदार डी. अरविंद यांनी म्हटलं की, हे पाहा, तुम्ही नोटाचं बटण दाबा, मीच जिंकेन. तुम्ही गाडीवर मत द्या, मीच जिंकेन. तुम्ही हातावर मत द्या, मीच जिंकेन. मी तुमच्या फायद्यासाठी इथे आलोय. येणार तर मोदीच.