मंत्रीपदाबाबत नाराजीच्या चर्चेनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्रातून दिंडोरीच्या खासदार भारती पवारसह चार जणांना संधी देण्यात आली. मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यांना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरू होत्या. आता या सर्व चर्चांवर पंकजा मुंडेंनी (Pankaja Mude) स्पष्टीकरण दिले आहे.

ई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार

पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्या म्हणाल्या ‘आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,’

मंत्रीपदामुळे मत वाढणार का?

इतर पक्षातून भाजपमध्ये (BJP)आलेल्यांनाच केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढणार की घटणार? याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘ मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचे एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे’

मी एवढी मोठी नाही

सामनामध्ये पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असे म्हणण्यात आले आहे. यावर त्या म्हणाल्या, ‘मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मी एवढी मोठी नाही की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचले नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन’

ज्या लोकांना पद मिळाली आहेत, ते मुंडे साहेबांमुळेच पुढे गेले आहेत. ते मुंडेंच्या विचाराचे लोक आहेत. ते मुंडे परिवारापेक्षा मोठे व्हावेत हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे ते आणि पक्ष वेगळा वाटत नाही. त्याचं दु:ख नाही. आम्हाला आनंदच आहे. विधानपरिषदेतही नव्या लोकांना घेतलं. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असेल. पक्षाने तसा अभ्यास केला असेल. नव्या लोकांना नवीन रोल मिळत असेल तर पक्ष त्याच्या फायद्या नुकसानाचं मोजमाप करेल, असे मिश्किल भाष्यही त्यांनी केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *