भाजप करणार शिवसेनेची 'कॉपी'; वापरणार 'हा' फंडा

भाजप करणार शिवसेनेची 'कॉपी'; वापरणार 'हा' फंडा

मुंबई | Mumbai

शिवसेनेत (shivsena) फुट पडल्यानंतर आता भाजप (BJP) सेनेची 'गाव तिथे शाखा' ही मोहीम हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेची ही मोहीम निवडणुकांमध्ये (Elections) चांगलीच गाजली होती. त्यानंतर आता भाजप सुद्धा गाव तिथे शाखा (Village Branch Campaign) मोहीम राबवणार आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, या शाखा युवकांना आकर्षित करून त्यांच्या शक्तीचा परिवर्तनासाठी उपयोग करणार आहेत. गावातील आणि शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचावा, हे या शाखेचे काम असणार आहे. तसेच राष्ट्र उभारणीशी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. याबद्दल नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपने एकेकाळी शिवसेनेच्या शाखांनी महाराष्ट्रात मिळवलेल्या तुफान यशांचा कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा येत्या काळात सुरू करण्याचा निर्धार भाजपने केला असून युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे या मोहिमेमागचे ध्येय आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com