Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपला मिळणार लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष? 'ही' नावे चर्चेत

भाजपला मिळणार लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

मुंबई । Mumbai

शिवसेनेतील (shivsena) बंडखोर आमदारांच्या (Rebel mla) मदतीने मागील अडीच वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपने (bjp) पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले आहे. शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते (bjp leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांचा शोध सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष ( BJP President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची टर्म फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात जागा निश्चित मानली जात असल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत (Lok Sabha and Vidhan Sabha elections) चांगले यश मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. त्यामुळे पक्षाकडून राम शिंदे (Ram Shinde) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नावावर विचार केला जात आहे.

दरम्यान, भाजपकडून अद्याप अधिकृतरित्या प्रदेशाध्यपदाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यपद सोडतात का? आणि त्यांनी पद सोडल्यास ही जबाबदारी कोणाकडे देण्यात येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या