नाशिक शहरात भाजप उभारणार कोव्हिड सेंटर

नाशिक शहरात भाजप उभारणार कोव्हिड सेंटर
संग्रहित छायाचित्र

नाशिक । प्रतिनिधी

महाविकास आघाडी विरुध्द भाजप हा राजकीय संघर्ष राज्यासह नाशिकमध्येही टोकाला पोहचला अाहे. करोना काळात मदत म्हणून भाजप स्वतंत्र यंत्रणा राबवत असून गल्ली बोळात जाऊन नागरिकांची अॅण्टि जन चाचणी केली जात आहे. तसेच पक्षाकडून शहरात कोव्हिड केअर सेंटर उभारणीची चाचपणी सुरु आहे.

नाशिकमध्ये करोना आढावा बैठकीत भाजप आमदार व खासदारांना बोलावले जात नाही. जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाय योजनांनबाबत भाजप लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवले जाते, असा आरोप भाजपकडून केला जात आहे.

महाविकास आघाडिकडुन सूडबुध्दीचे राजकारण सुरु असल्याची टिका करत भाजपने मागील आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितित झालेल्या करोना आढावा बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

त्यामुळे करोना संकटात महाविकास आघाडी विरुध्द भाजप यांच्यात शीतयुध्द सुरु असल्याचे पहायला मिळते. त्या पार्श्वभुमीवर भाजपने करोना संकटाशी दोन हात करण्यासाठि स्वता:ची यंत्रणा उभी केली आहे.

पक्षाचे नगरसेवकांद्वारे प्रभागातील गल्ली बोळात जाऊन आरोग्य पथक नागरिकांची अॅण्टीजेन टेस्ट करत आहे. आतापर्यंत २५ नगरसेवकांच्या प्रभागात सहा हजार रुग्णांची टेस्ट करण्यात आली आहे.

पुढील काळात अॅण्टिजन टेस्टची व्याप्ती वाढवली जाणार आहे. तसेच पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भाजपकडून शहरात दोन कोव्हीड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरु असून जागेची चाचपणी केली जात आहे.

या व्यतिरिक्त पक्षाचे आमदार, नगरसेवक यांच्या माध्यमातून परिसरात सॅनिटाईज फवारणी करणे, रोगराई पसरु नये म्हणून स्वच्छता मोहिम राबवणे, अर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे वाटप करणे याद्वारे करोना संकटात सेवा दिली जात आहे.

करोना संकटात आम्हाला राजकारणात पडायचे नाही. पक्षाकडून नागरिकांची अॅण्टिजेन चाचणी केली जात आहे. आतापर्यंत सहा हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत.
गिरिश पालवे, शहराध्यक्ष भाजप
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com