Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा; विधानसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा; विधानसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. काल शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता….

- Advertisement -

Maratha Reservation : अजित पवार गटाच्या आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार (MLA Laxman Pawar) यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार (MLA) पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) त्यांच्या राजीनाम्याचे पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असा मजकूर पवार यांनी पत्रात लिहिला आहे.

Deshdoot Political Special : फडणवीस पुन्हा येणार?

दरम्यान, खासदार हेमंत पाटील आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्यानंतर आता आणखी किती आमदार आणि खासदार (MLA and MP) आपल्या पदाचा राजीनामा देतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. तर दुसरीकडे आज सकाळी बीडमधील माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. याठिकाणी सुरुवातीला घरावर प्रचंड दगडफेक करून त्यांची गाडी जाळण्यात आली. यानंतर घराला देखील आग लावण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या एका टिप्पण्णीवरून हे मराठा आंदोलक संतप्त झाले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक लोकसभा : भाजपच्या खेळीने शिवसेनेची कोंडी? आण्णांना हवा बदल, आप्पांचे काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या