राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

दिल्ली | Delhi

राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळच्या (Nepal) वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या या नेपाळ दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये राहुल गांधी काठमांडूमधील प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये दिसत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ ट्विट करून भाजपने (Congress) काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत, असं मालवीय म्हणाले.

तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करताना म्हणाले की, सुटी, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट इत्यादी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत.

Related Stories

No stories found.