अब तेरा क्या होगा कालिया?; किरीट सोमय्यांचे अनिल परबांवर शरसंधान

अब तेरा क्या होगा कालिया?; किरीट सोमय्यांचे अनिल परबांवर शरसंधान
किरीट सोमय्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सचिन वाझे माफीचा साक्षीदार झालेला आहे. आता जर तो बोलू लागला तर परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी अडचण होणार असून अब तेरा क्या होगा कालिया असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैया यांनी आज नाशकात अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर तोफ डागली....

भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiyya) आज नाशिक (nashik) दौऱ्यावर आहेत. भाजपचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या वसंत स्मृती (Vasantsmriti) येथे ते माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale), सीमा हिरे (Seema Hirey), शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve), माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सोमय्या यांनी याप्रसंगी थेट मुख्यमंत्री ठाकरे (Chief minister udhav thackeray) व पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, श्रीजी होम्स कंपनी नोंदणीकृत नाही त्यात ८९ टक्के हिस्सा ठाकरे दाम्पत्याचा आहे. ही कंपनी कुणाची आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. भाजप भ्रष्टाचार सहन करणार नाही.

घोडेबाजाराचा आरोप करणारे गाढवच असू शकतात असे म्हणत किरीट सोमैय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com