Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकिरीट सोमय्यांचा राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले...

किरीट सोमय्यांचा राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई । Mumbai

शिवसेनेचे (shivsena) राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग (breach of code) केल्याचा आरोप (Allegations) भाजपा नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे…

- Advertisement -

राऊतांनी आमदारांची नावे जाहीर करण्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाने (Election Commission) याबद्दल योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेना (shivsena) भाजपा (bjp) राष्ट्रवादी आणि काँग्रेस (NCP and Congress) किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान (Voting) करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते.

परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आचासंहिता भंग केल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोग काय कारवाई (Action) करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या