श्रीजी होम्सचे खरे मालक कोण? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल

श्रीजी होम्सचे खरे मालक कोण? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

भाजप नेते (bjp leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) कुणावर घोटाळ्याचा आरोप करणार याकडे सबंध राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असतानाच सोमय्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांच्यासह दोन्ही मुले मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) आणि तेजस ठाकरे यांच्यावर आरोप केले.

श्रीजी होम्स (Shriji Homes) या कंपनीच्या माध्यमातून आदित्य आणि तेजस यांचा अर्थव्यवहार झालेला आहे. तब्बल २९ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. श्रीजी होम्सचे खरे मालक कोण आहेत? याचाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असेही ते म्हणाले.

नंदकिशोर चतूर्वेदी कुठे आहेत? तसेच प्रवीण कलमे यास पळून जाण्यास कुणी मदत केली. कलमे याच्यावर कारवाई का केली नाही? चतुर्वेदी यांचे ठाकरे घराण्याशी आर्थिक संबंध आहेत का? असे अनेक सवाल त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

चतुर्वेदी यास फरार घोषित करण्यात यावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. दुसरीकडे श्रीजी होम्समध्ये श्रीधर पाटणकर पार्टनर असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे टोयलेट घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर उत्तर देईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. आता या टोयलेट घोटाळ्यावर शिवसेना नेते संजय राऊत काय आरोप करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.