देवेंद्र फडणवीस पुन्हा करोना पाॅझिटिव्ह

देवेंद्र फडणवीस पुन्हा करोना पाॅझिटिव्ह

मुंबई । Mumbai

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना करोनाची लागण (Corona Positive) झाली आहे...

देवेंद्र फडणवीस हे काल (शनिवार) सोलापूर (Solapur) दौऱ्यावर होते. मात्र,प्रकृती अस्वस्थतेमुळे आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईत (Mumbai) दाखल झाले. त्यानंतर आज त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

फडणवीसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी कोविड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी" असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ (Increase in corona Patient) होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात आता राजकीय नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याचे समोर येऊ लागले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com