Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; केली 'ही' मागणी

देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi government) अल्पमतात आले आहे. तसेच उद्या ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे असल्याने महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपकडून बहुमत चाचणीच्या वेळी मनसेचे (mns) १ मत आपल्या बाजूने वळविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन करून मनसेचे एक मत भाजपाला देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची ही मागणी मान्य केल्याचे समजते. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीमध्ये (Majority test) मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) हे महाविकास आघाडीविरोधात मतदान (voting) करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अविश्वासदर्शक ठराव (No-confidence resolution) जिंकण्यासाठी भाजपासाठी प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपक्ष आमदारांना (Independent MLA) देखील तितके महत्व द्यावे लागणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपाकडून मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत असून राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात मनसेला स्थान मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या