Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे ? - देवेंद्र फडणवीस यांचा...

Video : तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे ? – देवेंद्र फडणवीस यांचा आघाडी सरकारला सवाल

मुंबई / प्रतिनिधी
हनुमान चालीसा म्हटल्याने राज्याच्या विरोधात कसा काय कट होतो, अशी विचारणा करत ‘तुम्ही रामाची की रावणाच्या बाजूने आहात? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आघडी सरकारला केली.

सायन येथील सोमय्या मैदानावर आज भाजपच्या पोलखोल अभियानाचा समारोपानिमित्त बुस्टर डोस सभा पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

- Advertisement -

‘तुम्ही म्हणजो हिंदुत्व नाही, याचा पुनरुच्चार करत फडणवीस म्हणाले, तुमचे साथीदार जेलमध्ये गेल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. तुमच्या सरकारने महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावला आहे. महाराष्ट्र सरकार बेवड्यांसाठी काम करत आहे. सर्वाधिक घोटाळे या सरकारने केले आहेत, असे आरोप त्यांनी केले.

जेव्हा बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे होतात, असा प्रश्न काहीजण करतात. पण जेव्हा बाबरी पाडली तेव्हा आपण उपस्थित होतो, असा दावा फडणवीस यांनी केला. बाबरी प्रकरणात ३२ आरोपी होती, त्यात सेनेचा एकही नेता नव्हता, असे फडणवीस म्हणाले. बाबरी कारसेवकांनी पाडली, असा दावा त्यांनी केला.

काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याची आवश्यकता होती म्हणून भाजपने हातमिळवणी केली, पण वेळ येताच ते सरकार पाडलेही, असा खुलासा त्यांनी केला. पेट्रोल वरील कर कमी का करत नाही, अशी विचारणा त्यांनी राज्य सरकारला केली.

चीनवर जरा बोला.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या सवालाचा प्रतिवाद फडणवीस यांनी केला. ‘ज्यांनी भारताचा मोठा मुलूख चीनला दिला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला. ‘तुमचे हिंदुत्व गदाधारी नसून गधाधारी आहे’, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. महाराष्ट्र दिनी नागरिकांसाठी एकही निर्णय घेतला नसल्याचे फडणवीस म्हणाले. १४ मे नंतर आपणही पोलखोल सभा घेणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अतुल भातखळकर यांची भाषणे झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या