Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAssembly Elections Results 2023 : चार पैकी भाजपची तीन तर कॉंग्रेसची एका...

Assembly Elections Results 2023 : चार पैकी भाजपची तीन तर कॉंग्रेसची एका राज्यात आघाडी

नवी दिल्ली | New Delhi

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे…

- Advertisement -

NCP Crisis : “अजित पवारांची भूमिका…”; ‘त्या’ गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी आहे.

शब्दगंध : ‘अवकाळी’चा फेरा

तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.

सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता

केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या