भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है!

आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर
भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील (State President MLA. Jayant Patil) यांना ईडी विभागाने (ED Department) चौकशीसाठी नोटीस बजावल्याने (Notice for Inquiry) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP workers) आज राज्यभरात आंदोलन (Movement across the state)केले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील आकाशवाणी चौकात जोरदार घोषणाबाजी करून ईडी आणि भाजपाविरोधात आंदोलन केलेे. दरम्यान राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले.

राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा सरकारद्वारे ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नाहक त्रास दिला जात आहे. ईडी आणि भाजपाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील आकाशवाणी चौकात ‘भाजपा हमसे डरती है, इडी को आगे करती है, भाजपा हटाव लोकशाही बचाव’ अशी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून पदाधिकार्‍यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर पाच ते सहा पदाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी परवानगी मिळाली.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, योगेश देसले, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कल्पना पाटील, सुनील माळी, राजू मोरे, सलीम इनामदार, डॉ.रिझवान खाटीक, अमोल कोल्हे, मौलाना हुसैन साबरी, सुमंताई बनसोडे, संगीता सूर्यवंशी, इब्राहिम तडवी,अशोक पाटील, सुशील शिंदे, रमेश बार्‍हे, चेतन पवार, ललित नारखेडे, कुंदन सूर्यवंशी, रहीम तडवी, सचिन साळुंखे, योगेश साळी, हितेश जावळे, आकाश हिरवाडे, शैलेश अभंगे, पंकज तनपुरे, सुहास चौधरी, विशाल देशमुख,चंद्रमणी सोनवणे, भाला तडवी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com