भाजपला धक्के : अमित शाह डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात

आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी(Assembly Election) भाजपाला (bjp)अनेक धक्के मिळत आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा हायअलर्टवर आली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजपाची कमान गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी हातात घेतली आहे. कोअर कमिटीची तब्बल 10 तास त्यांनी बैठक घेतली. कुठल्याही प्रकारे मौर्य यांना रोखून धरण्याचे आव्हान स्वीकारतांना समाजवादी पक्षातून (sp)मोठा मासा गाळाला लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

अमित शाह(Amit Shah) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना जबाबदारी दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची ताकद भाजपाला चांगलीच माहिती आहे. मौर्य यांच्या राजकीय ताकदीचा फायदा भाजपाला २०१७ च्या निवडणुकीत झाला होता. तेव्हा स्वामी प्रसाद मौर्य बीएसपीचे ताकदवान नेते होते. निवडणुकीच्या काळात त्यांनी बसपाची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता. यूपीच्या निवडणूक आखाड्यात ओबीसी समुदायाचं किती महत्त्व आहे हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे.

कोअर कमिटीची 10 तास खलबतं

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर भाजपच्या कोअर कमिटीची 10 तास बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशातील सहा क्षेत्रांचा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्तवाची चर्चा झाली आहे.