माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपमध्ये घरवापसी

प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी
माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपमध्ये घरवापसी

नाशिक | प्रतिनिधी

गत विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रामराम करुन शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला.

गत विधानसभा निवडणुकीत भाजपने नाशिक पूर्व मतदार संघातून बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादिकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महिनाभरातच राष्ट्रवादीचे घडयाळ मनगटावरुन उतरवून त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण खांद्यावर घेतले होते.

'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधले होते. मात्र सानप सेनेत रमले नाहीत. आज त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. सानप यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com