चार दिवसात नाशकात तीन खून, भाजप आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी

चार दिवसात नाशकात तीन खून, भाजप आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी सत्र सुरु आहे. नाशकात गेल्या चार दिवसात तीन खून झाले आहेत. भाजप (BJP) मंडल अध्यक्ष अमोल ईघे (Amol Ighe) यांची मध्यरात्री निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे...

अमोल इघे यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. आता भाजप आमदारांसह लोकप्रतिनिधींनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी केली असून पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी होत आहे. तसेच जयकुमार रावल धुळे येथून नाशिकसाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पुर्ण बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या खून, जिवघेणे हल्ले, चोर्‍या, अवैध व्यवसाय, अफू, चरस, गांजाचा व्यवसाय, दरोडे, बलात्कार सुरु असून पोलीस खात्याने यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलीस आयुक्तांनी विना हेल्मेट पेट्रोल देऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस तैनात केले आहेत.

चार दिवसात नाशकात तीन खून, भाजप आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी
भाजप मंडल अध्यक्षाची हत्या; चार दिवसात नाशकात तीन खून

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी (Police Commissioner Deepak Pandey) बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फौजफाट पाठवावा. अन्यथा भाजपच्या वतीने सर्व पोलीस (Police) ठाण्यांबाहेर ढोल बजाव आंदोलन (Agitation) केले जाईल, असा इशारा भाजप (BJP) नाशिक महानगर सरचिटणीस व कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com