भाजप कडून शहला काटशह : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार

भाजप कडून शहला काटशह : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath, Chief Minister of Uttar Pradesh ) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा.

त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane )यांच्याबद्दल वादग्रस्त लिखान लिहणाऱ्यांसह त्याचे होर्डिंग लावणाऱ्या व गुन्हे दाखल करावे अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने ( BJP delegation )पोलिस आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात भाजपातर्फे तक्रारदार शिवाजी बरके, सुनील केदार आणि ऋषिकेश आहेर यांनी सरकारवाडा व सायबर पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत.

भाजपा आमदार देवयानी फरांदे( BJP MLA Devyani Farande ), शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांची भेट घेतली. त्यात दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. दरम्यान, ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्री राणे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

तसेच सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केले आहे. त्यामुळे सामनाच्या संपादकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तर या अग्रलेखाचे होर्डिंग लावणाऱ्या शिवसेना विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदार फरांदे, शहराध्यक्ष पालवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकारवाडा व सायबर पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com