Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपच्या नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

भाजपच्या नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सांगली | Sangali

भाजपच्या (BJP) नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या ( murder) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची चारचाकी गाडी अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

या हल्लेखोरांनी विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जत तालुक्यातील सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा; खासदारांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार

या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच ताड यांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (Superintendent of Police Basavaraj Teli) जतकडे रवाना झाले आहेत.

पत्रकार शशिकांत वारिसेंचा मृत्यू अपघाताने नाही; सरकारने केला धक्कादायक खुलासा

विजय ताड (Vijay taad) हे मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर हा हल्ला झाला. ते आपल्या गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या शाळेतील आपल्या मुलांना आणण्यासाठी निघाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताड यांची गाडी अडवली आणि यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे आणि कोणी केला हे अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या