राष्ट्रवादीमुळे भाजपची राज्यात सत्ता आली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीमुळे भाजपची राज्यात सत्ता आली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे...

ते म्हणाले की, राज्यात सन २०१४ मध्ये आघाडीचे सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळय़ांना समजले, असे चव्हाण यांनी सांगितले.

तसेच काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक (Election) लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे ‘जी २३’चा मुख्य हेतू सफल झाला. पंरतु निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. याशिवाय काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. तशी आमची मागणी होती. आम्ही ती लावून धरली नसती तर कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com